शासनाचे बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमास दिनांक 22/01/2025 रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडून बेटी बचाव बेटी पढाव या रॅलीचे आयोजन करण्यात आले

शासनाचे बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमास दिनांक 22/01/2025 रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडील भरोसा सेल महिला सुरक्षा विशेष कक्ष सोलापूर शहर कडून आज दिनांक 04/02/2025 रोजी सकाळी 11 वाजता महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचे बेटी बचाव बेटी पढाव या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीस माननीय श्री.एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीची सुरुवात केली. सदर वेळी माननीय श्री अजित बोराडे पोलीस उपायुक्त सो. मुख्यालय माननीय डॉक्टर दिपाली काळे पोलीस उपयुक्त गुन्हे/ विशा. माननीय राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे महिला सुरक्षा विशेष कक्ष असे हजर होते