About Us
गुन्हे शाखा
पोलिस विभागात गुन्हे शाखेला मोठे महत्त्व आहे. ही शाखा प्रमुख्याने गुन्हेगारी तपासणी आणि अत्यंत संवेदनशील गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करते. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे क्लीष्ट व संवेधनशील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नावाजलेले आहेत.
यांचे तपासाचे क्षेत्र संपूर्ण आयुक्तालय हद्दीत आहे. त्यामुळे ही शाखा प्रमुख महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये पोलिस ठाण्यांसोबत समांतर तपास करते. याशाखेत गुन्हे आणि गुन्हेगारांच्या विविध प्रकारच्या नोंदीं ठेवले जातात.
त्याच्या खालील उपशाखा आहेत.
१. मोडस ऑपरेंडी ब्यूरो (MOB)
ही शाखा गुन्हेगारीच्या कार्यप्रणालीची माहिती गोळा करते आणि ज्ञात गुन्हेगारी नोंदणी, इतिहास पत्रक नोंदणी, दोषी व्यक्ती नोंदणीकृत आणि एमसीआर सारख्या नोंदी ठेवते. या माहितीमुळे ते तपास अधिकार्यांना गुन्ह्यांमध्ये सामील होण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांच्या संदर्भात सूचना देऊन मदत करते.
२. फिंगर प्रिंट
ही शाखा पोलीस ठाण्याकडील अटक आरोपी व शिक्षा प्राप्त आरोपींचे ठसे व त्यांची माहिती घेऊन त्याचा अभिलेख तयार करते. याचा उपयोग गुन्ह्यामध्ये सामील संशयीत यांच्याशी पडताळणी करून ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत करते.
Telephone number:- 9823777599 ,
Email ID:- picrime.cpsol@mahapolice.gov.in ,