शहरातील जड वाहतूक संदर्भात मा. पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक

दिनांक २७/०१/२०२५ रोजी १६ वा. पोलिस आयुक्तालय कार्यालय, सोलापूर शहर येथील मीटिंग हॉल मध्ये सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात मा. पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात अली होती, सदर बैठकीस जड वाहतूक असोसिएशन चे अध्यक्ष श्री. लक्ष्मण विटकर, पदाधिकारी व जवळपास १०० वाहन मालक, बिल्डर्स, कॉट्रॅक्टर उपस्थित होते… सदर बैठकीमध्ये मा. पोलिस आयुक्त सो यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत… १. वाहन मालक यांनी त्यांचे वाहनावर चालक म्हणून हुशार व ज्याला जड वाहन चालविण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे असा चालकाची नियुक्ती करण्यात यावी. २. शहरातील रस्त्यावर वाहनांचा वेग २० kmph पेक्षा जास्त असू नये.. ३. प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसविण्यात यावा. ४. प्रत्येक वाहन मालकाने आपल्या वाहनाच्या पाठीमागील दर्शनी भागात मोठ्या अक्षरात त्यांचा मोबाईल नंबर टाकावा, जेणेकरून चालक रैश ड्राइविंग करत असल्यास मालकाला संपर्क करता येईल. ५. वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये. ६. प्रत्येक वाहन चालकचा व मालकाचा मोबाईल नंबर, ड्राइविंग लायसन्स, आधारकार्ड यांची प्रत वाहतूक शाखेकडे जमा करावे. ७. विशेषत: चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही याबाबत मालकानी खात्री करावी. ८. वाहन चालक याचा कडून एखादा अपघात घडल्यास वाहन मालकाचीही त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्यात येईल. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करणेबाबत मा. पोलिस आयुक्त सो यांनी संबंधित पोलिस अधिकारी यांना सूचना दिल्या.