घरपोडीचा एक व चोरीचे पाच असे एकूण सहा गुन्हे शहर गुन्हेशाखे कडून उघड..
शहर गुन्हे शाखेने घरफोडी चोरीसह चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणून, एकूण ०३,९२,२९०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/विजय पाटील, सपोनि/जीवन निरगुडे, सपोनी/दादासो मोरे, सपोनि/संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.