सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी
सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी - पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ दिपाली काळे मॅडम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब त्यांचे दप्तरी सहा.फौ.अल्ताफ शेख, पोह. 569 एस.टि.उबाळे.पोह. 826 एस.जी.राठोड. पोकॉ/1542 संजय साळुंखे यांनी केला असून वरील सर्वांना मा. पोलीस आयुक्त श्री. एम राज कुमार सो यांचे हस्ते बेस्ट कन्व्हीक्शन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले.