पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आणि रोटरी ई क्लब ऑफ एलिट अँड फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला प्रवर्तन करणाऱ्यांसाठी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 18/03/2024 रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, रोटरी ई क्लब ऑफ इलाईट व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांचेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसाठी स्तन कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात मा. पोलीस उप आयुक्त डॉ. दिपाली काळे मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात 30 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपासणी करण्यात आली.